सामान्य विज्ञान (इयत्ता 9 वी) संपूर्ण माहिती
(भाग 1) :
· सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला 'द्रव्य' म्हणतात.
· द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत.
· अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असते.
· अनेक स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्यावर सुद्धा कायम असतो. ठराविक आकार व आकारमान असणार्याआ स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता (rigidity) असे म्हणतात.
· ऑक्सीजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायु धातूंच्या टाक्यामध्ये ठासून भरता येयात.
· स्थायूंमध्ये आंतररेंविय बल अतिशय प्रभावी असते.
· द्रवांमधील आंतररेंविय बल मध्यम असते तर वायूंमध्ये आंतर रेंविय बल क्षीण असते.
· अलीकडील काळात विज्ञानमध्ये रासायनिक पदार्थ या ऐवजी ‘पदार्थ’ हा शब्द प्रयोग करतात.
· आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॅव्हाझिए याने मूलद्रव्याची व्याख्या मांडली.
· दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनवलेल्या पदार्थ म्हणजे संयुग.
· लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले.
· लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो. त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.
· दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.
· मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.
· सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.
· सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.
· एक द्रव व एक अथवा अधिक स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला 'निलंबन' असे म्हणतात.
· विषमांगी मिश्रणांना कलीले म्हणतात.
· पचन विकारांवर वापरले जाणारे मिल्क ऑफ मॅग्नेशिया हेही एक कलिल आहे.
· द्रावणाच्या एक एकक एवढ्या आकारमानात विरघळलेल्या द्रव्याच्या वस्तुमानाला द्रावणाची संहती असे म्हणतात.
· इ.स. 1808 मध्ये इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन याने त्याचा प्रसिद्ध अणूसिद्धांत मांडला.
· द्रव्य हे अणूंचे बनलेले असते. अणू म्हणजे द्रव्याचे अविभाजनीय असे लहानात लहान कण होत.
· अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात.
· इ.स. 1997 मध्ये जे.जे. थॉमस या इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाने हायड्रोजन या अणूहून 1800 पट हलक्या कणांचा शोध लावला.
· सन 1932 मध्ये डॅनिश भौतिक शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अनुप्रारूप मांडले.
· सन 1932 मध्ये चॅडविक या वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून दिले.
· सन 1926 मध्ये मांडल्या गेलेल्या पुजायांत्रिकी या नव्या सिद्धांतामदध्ये अणूच्या संचरनेचे वर्णन दुसर्या पद्धतीने करण्यात आले.
· अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात. त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्युट्रॉन हे त्याचे दोन प्रकार आहेत.
· केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा बनलेला असतो.
· केंद्राबाहेरील सर्व इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनपरभारा एवढाच असल्यामुळे अणू हा विधूतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो.
·
पूर्वी
अणूत्रिज्येसाठी
अॅगस्ट्रोम (A०
= 10 -8 cm) हे
एकक वापरात
होते. आता
अॅगस्ट्रोमच्या
जागी
पिकोमीटर (pm) हे
एकक वापरात
आहे.
(1 pm = 10 -12 m)
· अणूवस्तूमानांक दर्शविण्यासाठी खास असे अणूवस्तुमान एकक डाल्टन वापरले जाते. (u)
· इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित मूलकण असून त्याचा निर्देश e असा करतात.
·
· इलेक्ट्रॉन चे वस्तुमान 0.00054859 u आहे.
· प्रोटॉन हा धनप्राभरित मूलकण असून त्याचा निर्देश P ह्या संज्ञेने करतात.
· न्युट्रॉन हे विधूतप्रभारदृष्टया तटस्थ असलेले मूलकण आहेत.
· भ्रमणकक्षा (कवच) मध्ये सामावणार्याल इलेक्ट्रॉनची अधिकतम संख्या
· KLMN या या कावचांमध्ये 2, 8, 18, 32 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकत नाहीत. मात्र कोणत्याही अणूच्या शेवटच्या म्हणजेच सर्वात बाहेरील कवचामध्ये जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन सामावू शकतात.
· K कवचातील इलेक्ट्रॉनची उर्जा कमी असते.
· हेलियम, निऑन यांसारखी काही थोडी मूलद्रव्ये कोणत्याही अणुबरोबर संयोग न पावता मुक्त अशा अनुस्थिती मध्येच अस्तित्वात असतात.
· अणूंच्या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा असे म्हणतात.
· संयुजा हा अणूचा मूलभूत रसायनिक गुणधर्म आहे.
· अणूच्या बाहयतम कवचाला त्याचे संयुजा कवच असे म्हणतात.
· ज्यांचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूची संयुजा शून्य असते.
· बारा न्यूक्लिऑन असलेल्या कार्बन अणूचे जे वस्तुमान त्याच्या 1/12 एवढे वस्तुमान म्हणजे एक अणुवस्तुमान एकक (a.m.u.) होय.
· अणुवस्तुमानांक A या संज्ञेने दर्शविला जातो.
· एखाद्या अणुमधील एकूण प्रोटॉनच्या संखेला अणुअंक म्हणतात व तो Z या संज्ञेने दर्शविला जातो.
· सारखाच अणुअंक परंतु वेगळा वस्तूमानांक असणार्या अणूंना असस्थानिक असे म्हणतात.
· हायड्रोजन च्या इतर दोन समस्थानिकांना स्वतंत्र नावे असून ती ड्युटेरियम व ट्रिटियम अशी आहेत.
· क्लोरीनचे सरासरी अणुवस्तुमान 35.5 एवढे आहे.
· रेणूवस्तुमानालाच पूर्वी रेणुभार म्हणत. एकक u
· अणु व रेणूंची सापेक्ष संख्या समजण्यासाठी वैज्ञानिकांनी ग्रॅम मोल ही संकल्पना विकसित केली.
· पदार्थाच्या एक ग्रॅम – मोल एवढ्या राशीत असणार्यार रेणूंच्या संख्येसाठी N ही संज्ञा वापरतात. या वैशिष्ट्यपूर्ण संख्येला 'अॅव्होगड्रोअंक' असे म्हणतात.
· आजपर्यंत माहीत असलेली एकूण मूलद्रव्ये जवळपास 116 आहेत.
· मूलद्रव्याच्या व्यवस्थितरीत्या केलेल्या मांडणीलाच 'वर्गीकरण' म्हणतात.
· मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुभारांकांचे आवर्तीफल असतात.
· गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्थानांतरणीय गती, घर्णून गती, दोलन गती.
· स्थानांतरणीय गती एकरेषीय असू शकते किवा तिचा मार्ग वक्राकारही असू शकतो.
· अंतर ही अदिश राशि आहे तर विस्थापन ही सदिश राशि आहे.
· ज्या भौतिक राशींचे मापन दुसर्याप राशींवर अवलंबून नसते त्यांना मूलभूत राशि असे म्हणतात. उदा. लांबी, वस्तुमान, वेळ, इ.
· एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास त्या वस्तूची ‘चाल’ किंवा 'सरासरी चाल' असे म्हणतात.
· एखाधा वस्तूने एकक काळात एखाधा विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास त्या वस्तूचा वेग अथवा सरासरी वेग म्हणतात.
· वेगामधील बदलाचा दर म्हणजे त्वरण होय.
· जर वस्तूच्या वेगात वाढ होत असेल तर त्या वस्तूचे त्वरण धन (+ve) असते. जर वस्तूचा वेग कमी होत असेल तर त्वरण (-ve) ऋण असते.
· जी भौतिकराशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्ण व्यक्त करता येते तिला ‘अदिश राशी’ किवा 'अदिश' असे म्हणतात.
· अदिश राशींची बेरीज-वजाबाकी अंकगणिताचे नियम वापरुन करता येते.
· अदिश राशी-व्स्तुमान, चाल, कार्य, आकारमान, घनता, वेळ, अंतर, ऊर्जा.
· जी भौतिक राशी पुर्णपणे व्यक्त करण्यासाठी तिचे परिणाम व दिशा या दोन्हींची आवश्यकता असते तिला ‘सदिश राशी’ किंवा 'सदिश'असे म्हणतात.
· सदिश राशी – विस्थापन, वेग, त्वरण, बल, गती, वजन
· सदिश राशी दर्शविण्यासाठी डोक्यावर बाण काढलेल्या चिन्हाचा वापर केला जातो.
· गतीविषयक तीन समीकरणे
1. v = u +
at
2. s = ut
+ ½ at2
3. v2 = u2 + 2as
· एखाधा वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडवून आणणारी किंवा बदल घडवून आणण्याची प्रवृत्ती असलेली भौतिक राशी म्हणजे 'बल'होय.
· प्रत्येक वस्तू तिच्या गतिमान अवस्थेतील बदलाला म्हणजेच त्वरणाला विरोध करते. विरोध करणार्यााच्या या वृत्तीला 'जडत्व' असे म्हणतात.
· वस्तूमान आणिवेग यांच्या गुणाकाराला संवेग म्हणतात.
· संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशीने होते.
· एकक वस्तुमानात एकक त्वरण निर्माण करणार्याी बलास एकक बल असे म्हणतात.
· MKS पद्धतीने 1kg वस्तूमान 1 m/s2 त्वरण निर्माण करणार्याह बलास एक न्यूटन बल असे म्हणतात.
· एखाधा वस्तुमानावरील कार्यरत बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानास व तिच्यावरील परिणामी त्वरण सामानुपाती असते.
· प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. उदा. रॉकेट किंवा अग्निबाण.
· दोन वस्तूंची टक्कर झाली तर या वस्तूंचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो.
· निसर्गात आढळणार्यां आणि परस्परांपासून भिन्न असणार्याए सर्व बलांचे चार मुख्य प्रकार आहेत.
1) गुरुत्वबल,
2) विधूत चुंबकीय बल,
3) केंद्राकीय बल,
4) क्षीण बल,
· सर्वांसाठी न्यूटन (N) हे एकक वापरले जाते.
· न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.
· प्रयुक्त आकर्षणबलास ‘गुरुत्वबल’ म्हणतात.
· पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते.
·
विश्वातील
कोणत्याही
दोन वस्तू
कोठेही असल्या
तरी
त्यांच्यात
परस्परांना
आकर्षणारे गुरुत्वबल
प्रयुक्त
असते.
हे बल त्या
वस्तूंच्या
वस्तुमानाच्या
गुणाकाराशी
समानूपाती व
वस्तूंमधील
अंतराच्या वर्गाच्या
वस्तानुपाती
असते.
· G चे मूल्य सर्व वस्तूंसाठी सारखेच आहे. म्हणून G ला 'विश्वगुरुत्व स्थिरांक' म्हणतात.
· G चे मूल्य 6.67×10-11 Nm2/kg2 आहे.
· पृथ्वीचे वस्तुमान M=6×1024kg आहे. सरासरी त्रिज्या R=6400 km आहे.
· एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.
· वस्तूचे वजन हे तिच्यावर कार्यरत पृथ्वीचे गुरुत्वबल होय.
· एखाधा वस्तूचे वस्तूमान म्हणजे त्या वस्तूत सामावलेल्या एकंदर द्रव्याची राशी होय.
· कोणत्याही वस्तूंवर कार्यरत गुरुत्वत्वरण किंवा गुरुत्वबल विषुववृत्तापेक्षा ध्रुवावर जास्त असते.
· गुरुत्व त्वरणचे मूल्य ध्रुवावर 9.83m/s2 तर विषुववृत्तावर 9.78 m/s2 आहे.
· सामान्य पदार्थातील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवण्यार्या/ बलास विधूतचुंबकीय बल असे म्हणतात.
· विधुत चुंबकीय बल गुरुत्व बलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे.
· विधुत चुंबकीय बलाचे परिणाम साधारणपणे गुरुत्वाबलाच्या 1039 पट आहे.
· केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवते.
· इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन यांच्या होणार्याध अन्योन्य क्रियांमध्ये प्रयुक्त होणारे बल क्षीण बल म्हणून ओळखले जाते.
· एखाधा वस्तूवर क्रिया करणार्याॉ बलामुळे त्या वस्तूचे बलाच्या दिशेने विस्थापन झाले तरच कार्य झाले असे म्हणतात.
· SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन तर विस्थापनाचे एकक मीटर व कार्याचे एकक ज्यूल (Joule) आहे.
· CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर तर कार्याचे एकक अर्ग आहे.
· 1 Joule = 107 अर्ग.
· एखाधा पदार्थात असलेली कार्यकरण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा.
· ऊर्जेची विविध रुपे – यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, विधुत चुंबकीय, रासायनिक, औष्णिक, सौर, इ.
· पदार्थाच्या गतीमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या उर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात.
· KE = ½ mv2
· पदार्थाच्या विशिष्ठ स्थितीमुळे किंवा आकारामुळे त्यात जी ऊर्जा समावलेली असते, तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. उदा. डोंगरावरील दगड, धरणातील साठविलेले पाणी.
· दोर्याेची लांबी जास्त असेल तर दोलनकाल जास्त असतो आणि वारंवारता कमी असते.
· ज्या सरल दोलकाचा दोलनकाल 2 सेकंद असतो त्याला सेकंद दोलक असे म्हणतात.
· दोलनकाल T = 2π √e/g या समीकरणाने काढता येतो.
· सूर्याच्या केंद्रकाचे तापमान 107 k(Kelvin) आहे असे अनुमान आहे.
· एखाधा पदार्थात उष्णतेची असलेली पातळी म्हणजेच तापमान.
· वैधकीय तापमापीवर सेल्सियस अशांमध्ये 35 ते 42 पर्यंत खुणा असतात.
· केवल मापनश्रेणीची सुरुवात सर्वात कमी तापबिंदुपासून होते. या तापमानाला रेणूंची गती थांबते, म्हणून या बिंदुला केवल शून्य असे म्हणतात. त्याचे मुल्य – 2730 K एवढे असते.
· केवल मापनश्रेणी म्हणजेच केलव्हीन मापन श्रेणी होय. या मापन श्रेणीवर पाण्याचा गोठणबिंदु हा 273 k व उत्कलनांक असे म्हणतात.
· ज्या स्थिर तापमानाला द्र्वपदार्थाचे वायुरूपस्थितीत रूपांतर होते, त्या तापमानाला त्या पदार्थाचा उत्कलनांक असे म्हणतात.
· द्र्वावरील दाब कमी केला की उत्कलनांक कमी होतो व दाब वाढविला की उत्कलनांक वाढतो.
· विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण जास्त असेल तर त्या पदार्थाच्या द्रवनांक कमी होतो.
· अमोनियम नायट्रेट व सोडीयम सल्फेट यांचे मिश्रण 5:6 या प्रमाणात घेतल्यास मिश्रणाचे तापमान – 100C पर्यंत खाली येते.
· बर्फ व मीठ यांच्या योग्य प्रमाणातील मिश्रणाचे तापमान – 230 से. पर्यंत खाली येते.
· द्र्वामध्ये विद्राव्य क्षार विरघळला असेल तर त्याचा उत्कलनांक वाढतो.
· बाष्पीभवनाचा दर हा द्र्वाच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाशी समप्रमाणात असतो.
· अभिसरणामुळे खारे वारे व मतलई वारे निर्माण होतात.
· विधुत चुंबकीय तरंगाच्या स्वरुपात व द्रव्य माध्यमाच्या शिवाय होणार्या उष्णतेच्या स्थानांतरणास प्रारण असे म्हणतात.
· गोलीय आरसा ज्या गोलापासून बनविला आहे, त्या गोलाच्या केंद्रबिंदूला (C) आरशाचे वक्रता केंद्र म्हणतात.
· बहिर्वक्र आरशाला अपसारी आरसा असेही म्हणतात.
· ज्या प्रतिमेतून प्रकाशाचे वास्तव अभिक्रमन होते व तेथून पुढे प्रकाश अपसृत होतो ती वास्तव प्रतिमा तर ज्या प्रतिमेतून प्रकाश अपसृत होण्याचा भास होतो ती आभासी प्रतिमा.
· वाहनाच्या चालकासाठी बहिर्वक्र आरसा असतो.
· बहिर्वक्र आरशाने वस्तूपेक्षा लहान व सुलट प्रतिमा तयार होतात.
· दाढी करताना वापरावयाचा आरसा हा अंतर्वक्र आरसा असतो.
· या आरशामध्ये सुलट आणि मोठी प्रतिमा दिसते आणि दाढी करणे सोयीचे होते.
· प्रकाशाच्या आपतन दिशेतील सर्व अंतरे धन तर विरुद्ध दिशेतील अंतरे ऋण मोजली जातात.
· वस्तू नेहमी आरशाच्या डाव्या बाजूला ठेवलेल्या असतात. म्हणजे प्रकाशाची अपतनाची दिशा डावीकडून उजवीकडे असेल.
· आरशापासून वस्तूचे अंतर u आणि प्रतिमेचे अंतर v यांचे आरशाचे नाभीय अंतर व वक्रता त्रिजेशी संबंध दर्शविणारे सूत्र म्हणजेच आरशाचे सूत्र होय.
· सूत्र : 1/u + 1/v = 1/f =2/R
· बहिर्वक्र आरशाने नेहमीच सुलट आणि आभासी प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा लहान असते.
· अंतर्वक्र आरशासमोर त्याच्या नाभीय अंतरापेक्षा कमी अंतरावर वस्तू ठेवल्यास तिची आभासी, सुलट आणि वस्तूपेक्षा मोठ्या आकाराची प्रतिमा दिसते.
· जर वस्तूचे आरशापासूनचे अंतर नाभीय अंतरापेक्षा जास्त असेल तर मात्र आंतरर्वक्र आरशाने वास्तव व उलटी प्रतिमा तयार होते.
· रशियाचा ‘युरी गागरीन’ हा अवकाशात जाणारा पहिला मानव होता, तर अमेरिकेचा ‘नील आर्मस्ट्रॉग’ याने चंद्रावर सर्वप्रथम पाय ठेवला.
· स्वादुपिंड इन्सुलिनची निर्मिती करते.
· अब्जांशी तंत्रज्ञान म्हणजे एक किंवा अधिक अणू किंवा रेणू यांची रचना, मांडणी वापरुन अत्यंत सूक्ष्म असे नवीन पदार्थ, आकार किंवा उपकरणे तयार करणे.
· एक नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचा अब्जावा भाग होय.
· 1 nm = 1 m अब्जावा.
(भाग 2) :
· हेलिअम (He), नियॅान (Ne), आरगॅान (Ar) यांच्या सारखे निष्क्रिय वायू किंवा राजवायू मुक्त अवस्थेत आढळून येतात.
· हायड्रोजन(H), ऑक्सिजन(O), क्लोरीन(CI), सोडियम (Na), मॅग्नेशिअम (Mg) इ. मूलद्रव्ये रेणू किंवा संयुगाच्या रुपात आढळतात.
· राजवायूंच्या बाहयतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन असून त्यांच्या बाहयतम कक्षा पुर्णपणे भरलेल्या आहेत. त्या कक्षांना अष्टक म्हणतात.
· राजवायूंव्यतिरिक्त इतर सर्व मूलद्रव्यांच्या बाहयतम कक्षा अपूर्ण असतात.
· रासायनिक बदलात धातूंची इलेक्ट्रॉन देण्याची तर आधातूंची इलेक्ट्रॉन घेण्याची अथवा भागीदारी करण्याची प्रवृत्ती असते.
· ऋणभारीत इलेक्ट्रॉन दिल्यामुळे धनप्रभारीत आयन तयार होतो. त्याला कॅटायन असे म्हणतात.
· इलेक्ट्रॉन दिल्यानंतर सोडीयमच्या इलेक्ट्रॉनी संरूपणात बदल होऊन तो निऑन (Ne) या निकटतम निष्क्रिय वायूंचे स्थायी इलेक्ट्रॉनी संरूपन प्राप्त करतो.
· ऋणप्रभारित आयनास अॅनायन (Anion) असे म्हणतात.
· रेणूंमध्ये अणूंना एकत्र धरून ठेवण्यास जी आकर्षण शक्ती जबाबदार असते त्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध म्हणतात.
· एका अणूपासून दुसर्या अणुकडे इलेक्ट्रॉनच्या स्थानांतरणामुळे तयार होणार्या) रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विधुत संयुज बंध म्हणतात.
· Na व C1 स्वतंत्रपणे धोकादायक असले तरी त्यांचे संयुग मीठ (NaC1) सुरक्षित आहे.
· सारख्याच किंवा एका मूलद्रव्यापासून तयार होणारी संयुगे दोन आणूमधील देवघेवीमुळे तयार होत नाहीत, तर संयोग पावणार्याद अणूमध्ये होणार्या N इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे तयार होतात. या बांधाला 'सहसंयुज बंध' असे म्हणतात.
· जेव्हा रेणुमधील दोन अणूमध्ये एकाच इलेक्ट्रॉन जोडीची भागीदारी होऊन बंध तयार होतो. त्या बांधाला एकेरी बंध असे म्हणतात.
· मिथेन रेणुमध्ये C-H असे चार एकेरी बंध असतात.
· जेव्हा रेणूंच्या दोन अणूमध्ये दोन इलेक्ट्रॉनच्या जोडयाची भागीदारी होते, तेव्हा ते दोन अणू दुहेरी बंधने बांधले जातात. उदा. इथिलीन (C2H4)
· जेव्हा दोन अणूमध्ये तीन इलेक्ट्रॉनच्या जोड्यांची भागीदारी होऊन तीन बंध तयार होतात त्याला 'तिहेरी बंध' म्हणतात. उदा. अॅसीटिलीन (C2H2) H-C
· सामाईक इलेक्ट्रॉनना स्वत:कडे आकर्षित करण्याच्या अणूच्या क्षमतेला या मूलद्रव्याची विधुतऋणता म्हणतात.
· आयनिक संयुगे पाण्यात विरघळल्याने आयन विलग होण्याच्या प्रक्रियेला विचरण असे म्हणतात.
· शुद्ध पाणी विजेचे दुर्वाहक असते.
· रेणूपासून आयन विलग होण्याच्या प्रक्रियेला आयनीभवण असे म्हणतात.
· अणुने किंवा अणूंच्या गटाने एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन दिले असता किंवा घेतले असता तयार होणार्याय आयनांना 'मुलक' असे म्हणतात.
· धन आयन किंवा मुलके यांनाच कॅटायन (cation) किंवा आम्लारिधर्मी मुलके असे देखील म्हणतात. उदा. Na+, k+, Mg2+, A13+, NH4+
· ऋण आयन किंवा मुलके यांनाच अॅनायन किंवा आम्लधर्मी मुलके असे देखील म्हणतात. उदा. C1-, S2-, SO42-, CO32-
· साधे मुलक एका अणूपासून बनलेले असते व ते धनप्रभारीत किंवा ऋण प्रभारित असते. उदा. K+, Ca2+, A13+, C1-, O2-, N3- इ.
· संयुक्त मुलकांमध्ये अणूंचा गट असतो व तो गट दोन किंवा अधिक प्रकारच्या अणूपासून तयार झालेला असतो ते धन प्रभारित व ऋण प्रभारित व ऋण प्रभारित असतात उदा. CO23-, NH4+
· पदार्थामध्ये होणार्यात ज्या बदलात त्याचे फक्त भौतिक गुणधर्म बदलतात कोणताही नवा पदार्थ तयार होत नाही आणि मूळ पदार्थ सहजासहजी परत मिळतो अशा बदलास भौतिक बदल म्हणतात.
· उदाहरणे- मीठ पाण्यात विरघळते, पाण्याचे बर्फात रूपांतर होणे, पाण्याचे वाफेत रूपांतर होणे, इ.
· ज्या बदलामध्ये भाग घेणार्या् पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते व नवीन तयार झालेल्या पदार्थाचे गुणधर्म हे मूल पदार्थांपेक्षा पुर्णपणे वेगळे असतात, अशा बदलाला रासायनिक बदल म्हणतात.
· उदाहरणे – स्वयंपाकाचा गॅस जळणे, केरोसिन जळणे, दुधापासून दही होणे, अन्नपदार्थ आंबणे, अन्नपदार्थाचे पचन होणे.
· ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता मुक्त होते त्यांना उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात.
· ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता शोषली जाते तिला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात.
· रासायनिक अभिक्रिया म्हणजे अभिक्रियांचे तपशीलवार विवेचन होय.
· समीकरणाच्या डाव्या बाजूस अभिक्रियाकारके व उजव्या बाजूस उत्पादिते लिहावीत.
· संतुलित समीकरणामध्ये अभिक्रिया कारके व उत्पादिते यांच्यातील प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या दोन्ही बाजूला सारखी असते.
· ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून फक्त एकच उत्पादित मिळते अशा अभिक्रियांना 'संयोग अभिक्रिया' म्हणतात.
· ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच संयुगापासून दोन किंवा अधिक साधे पदार्थ मिळतात त्या अभिक्रियेला 'अपघटण अभिक्रिया' म्हणतात.
· एखाधा पदार्थातील अणू किंवा अनुगट, दुसर्या पदार्थातील अणू किंवा अनुगट यांची जागा घेऊन नवीन पदार्थ तयार करत असतील, तर अशा अभिक्रियांना 'विस्थापन अभिक्रिया' असे म्हणतात.
· ज्या रासायनिक अभिक्रियेत दोन संयुगांच्या घटकाची आपापसात अदलाबदल होऊन दोन नवीन संयुगे तयार होतात अशा अभिक्रियांना 'दुहेरी अपघटण' अभिक्रिया म्हणतात.
· ज्या रासायनिक अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी जास्त कालावधी लागतो अशा अभिक्रियांना 'मंद अभिक्रिया' म्हणतात. उदा. भाजीपाला कुजणे, लोखंड गंजणे, दही होणे.
· ज्या रासायनिक अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी खूपच कमी कालावधी लागतो. त्यांना शीघ्र अभिक्रिया म्हणतात. उदा. ब्लिचिंग पावडरची प्रक्रिया.
· रासायनिक अभिक्रियेत, अभिक्रियाकारकांच्या उत्पादित संहतीमध्ये एकक कालावधीत घडून येणारा बदल म्हणजेच ‘रासायनिक अभिक्रियेचा वेग’ होय.
· अभिक्रिया कारकांचे स्वरूप किंवा क्रियाशीलता रासायनिक अभिक्रियांच्या वेगावर परिणाम करते.
· रासायनिक अभिक्रियेत भाग घेणार्यां अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा वेग जास्त असतो.
· अभिक्रियेचे तापमान वाढविल्यास अभिक्रियेचा वेगदेखील वाढतो.
· ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो/बदलतो परंतु त्या पदार्थांमध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थांना उत्प्रेरक असे म्हणतात.
· उत्प्रेरकामुळे रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढतो किंवा ती प्रक्रिया कमी तापमानाला होते.
· अपमार्जकांमध्ये (Detergent) विकारांचा (Enzymes) उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात.
· आपले स्नायू, त्वचा, केस यांची जडणघडण करणारे प्रोटीन म्हणजे कार्बणी संयुगे असतात.
· आपला अनुवंशिकीय वारसा ठरविणारी RNA व DNA ही न्यूक्लिइक आम्ले कार्बन संयुगे असतात.
· आपण खातो ते अन्न घटक म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन मेदयुक्त पदार्थ व जीवनसत्वे ही कार्बन संयुगे असतात.
· सुगंधी द्रव्ये, जीवाश्म इंधने, औषधे व कीटकनाशके, प्लॅस्टिक व रंजकद्रव्ये अशा विविध प्रकारच्या द्र्व्यामध्ये कार्बनसंयुगे असतात.
· कापूस, रेशीम, लोकर, पॉलिस्टर, टेरिलीन, नायलॉन यांसारखे आपल्या वस्त्रांचे धागे हे कार्बन संयुगांचेच बनलेले असतात.
· आपले जीवन ‘ कार्बन’ या मूलद्रव्यावर आधारलेले आहे.
· कार्बन संयुगांची विविधता प्रचंड आहे. त्यांचा विस्तार एकच कार्बन अणू असलेल्या मिथेनपासून ते अब्जावधी कार्बन अणू असलेल्या डी.एन.ए. पर्यंत पसरलेला आहे.
· कार्बनचा अणूअंक 6 असून त्यातील इलेक्ट्रॉनचे कवचनिहाय वितरण 2, 4 असे आहे.
· कार्बनची संयुजा 4 आहे.
· कार्बनकडे मालिका बंधन शक्ति असून त्याच्या खूप लांब साखळ्या बनू शकतात.
· म्हणून कार्बनची संयुगे मोठया प्रमाणावर तयार होतात व त्यामुळे कार्बन हे अव्दितीय मूलद्रव्य ठरते.
·
बहुसंख्य कार्बन
संयुगामध्ये
सर्वसाधारणपणे
आढळणारे
मूलद्रव्य
म्हणजे
हायड्रोजन.
सर्वात साध्या
कार्बन
संयुगामध्ये
फक्त कार्बन व
हायड्रोजन ही
दोनच
मूलद्रव्ये
असतात.
त्यांना
हायड्रोकार्बन
म्हणतात.
· कार्बनच्या चार संयुंजांचे समाधान चार स्वतंत्र अनुंशी एकेरी बंध करून झालेले असते. अशा हायड्रोकार्बनना संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात.
· दुसर्या प्रकारात हायड्रोकार्बनमधील किमान दोन कार्बन अणू एकमेकांशी बहुबंधाने जोडलेले असतात.
· बहुबंधामधील कार्बन अणू हे त्या रेणुमधील इतर कार्बन अणूंपेक्षा वेगळे असतात.
· मिथेन हा सर्वात साधी संरचना असलेला हायड्रोकार्बन असून त्याच्या रेणूत केवळ एकच कार्बन अणू असतो.
· इंधन खाणी, कोळसा खाणी, गोबर गॅस व बायोगॅस मध्ये दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन असतो.
· ज्वलनशीलतेमुळे मिथेनचा इंधन म्हणून वापर केला जातो.
· हायड्रोजन व अॅसिटिलीन वायूंचे औधोगिक उत्पादन मिथेनपासून मिळते.
· इथेन हा संतृप्त हायड्रोकार्बन आहे.
· इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटाच्या किन्वण प्रक्रियेने मिळविले जाते.
· इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटांच्या किन्वन प्रक्रियेने मिळविले जाते.
· पॉलिथिन हे इथिलीन पासून बनविले जाते.
· अॅसीटिलीन हा असंतृप्त हायड्रोकार्बन आहे.
· ऑक्सिअॅसिटिलीन च्या ज्योतीचे तापमान नैसर्गिक वायू किंवा हायड्रोजन वायूंच्या जोतीपेक्षा जास्त असते.
· PVC या बहुवारिकाच्या उत्पादनासाठी लागणार्याग कार्बन संयुगाच्या आधौगिक उत्पादनासाठी अॅसिटीलीन वापरला जातो.
· सजीवांमधील रुपिकीय आणि कार्यरूपी विचरणास ‘जीवनसृष्टीची विविधता’ असे म्हणतात.
· वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समुहांना वर्गेकक (Taxa) असे म्हणतात.
· वर्गीकरणामधील पदानुक्रमात वर्गेककांचा स्तर पुढील प्रमाणे असतो. जाती, प्रजाती, कुल, गण, वर्ग, विभाग, संघ.
· वनस्पतीमधील सर्वात उच्च स्तरीय वर्गेककास ‘विभाग’ म्हणतात. तर प्राण्यातील सर्वोच्च स्तरास संघ (phylum) म्हणतात.
· सर्वात उच्चस्तरीय वर्गेकक म्हणजे ‘सृष्टी’(Kingdom).
· सर्व सजीवांची नावे दोन शब्दांच्या समूहाने दर्शवितात. प्रथम नावास प्रजाती नाम तर दुसर्या नावास जाती नाम म्हणतात.
· मनुष्यप्राण्याचे वैज्ञानिक नाव 'होमो-सेपियन्स' असे आहे.
· ही व्दींनामसूत्रीय नामकरण पद्धती कॅरोलस लिनियास ने शोधली.
· अॅरिस्टॉटल आणि त्याच्या शिष्य थिओफ्रस्टस यांनी प्रथमच व्दिसृष्टी पद्धतीने वनस्पति व प्राणी यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयन्त केला.
· आर.एच.व्हीटावर यांनी पंचसृष्टी पद्धती अस्तित्वात आणली.
· चयापचयी क्रिया अभ्यासणारी शाखा म्हणजे 'शरीरक्रिया शास्त्र'.
· सस्तन प्राण्याच्या शरीरामध्ये आढळणारे हिमोग्लोबिन हे एक प्रथिन आहे.
· मानव आणि गोरीला यांच्या हिमोग्लोबिनच्या रेणुच्या संरचनेत फक्त एका अमिनो आम्लाचा फरक असतो.
· मानव व र्हीसस माकड यांच्या हिमोग्लोबीन रेणुच्या संरचनेत चार अमिनो आम्ले असतात.
· एखाधा सजीवाच्या भ्रूणापासूनच्या विकासाच्या अभ्यासास 'भ्रोणिकी' (Embroyology) असे म्हणतात.
· मासा, कासव, पक्षी, डुक्कर, मानव यांचे भ्रूण प्रारंभिक अवस्थेत समान असतात.
· स्वसंरक्षण यंत्रणेशी निगडीत रक्त गुणधर्माचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा म्हणजे रक्तद्रव्यशास्त्र होय.
· वर्गीकरणाची अत्याधुनिक पद्धती डी.एन.ए., आर.एन.ए. आणि प्रथिने या जैवरेणूच्या अभ्यासवर आधारित आहे.
· तंतुरूपी कवकांना ‘बुरशी’ म्हणतात. उदा. पेनिसिलियम, म्युकर
· एकपेशीय कवकांना ‘किन्व’ असे म्हणतात. उदा. सॅकरोमायासिस.
·
ज्या
संरचनेत
निलहरित
जीवाणू आणि
शैवाल यांपैकी
एक सजीव कवकाबरोबर
सहजीवन जगतो, त्यांना
शैवाक असे
म्हणतात.
· उस्निया या शैवकाचा उपयोग मसाल्यात केला जातो. (Lichens)
· जीवाणू हे सूक्ष्मदर्शीकीय एकपेशीय सजीव आहेत. त्यांना आदिकेंद्रकी सजीव असे म्हणतात.
· हरिता (Mass) या वनस्पतीमद्धे संवहनी संस्थेचे कार्य करणारे संवहनी पट्ट असतात.
· बीजाणुधानींच्या समुहास 'शंकू' असे म्हणतात. उदा. इक्किसेटम.
· फिलिसिनी हा वनस्पतींचा सर्वात मोठा वर्ग आहे. या वनस्पतींना 'नेचे' असे म्हणतात.
· निलवर्णीय देवमाशामध्ये प्राणी हे सुमारे ३५ मी. लांबी एवढे प्रचंड असतात.
· संघ प्रोटोझुआ – अमिबा, एंटामिबा, प्लाझामोडियम, पॅरॅमेशिअम, युग्लिना, इ.
· प्लाझामोडियम हा परजीवी आदिजीवी मानवाच्या तांबडया पेशीमध्ये आढळतो.
· प्लासमोडियममुळे मलेरिया हा रोग होतो. माध्यम अॅनाफेलीस डासाची मादी.
· संघ पोरीफेराची उदाहरणे- सायकोण, युस्पांजिया (आंघोळीचा स्पंज), हायलोनिमा.
· हायड्रा हा दंडाकृती आकाराचा गोडया पाण्यात आढळणारा सिलेंटरेट आहे.
· चपटे कृमी उभयलिंगी असतात.
प्राणी सृष्टी
· पेशींच्या संघटित समुच्चयाला उती असे म्हणतात.
· वनस्पतीमध्ये उतीचे दोन प्रकार आढळतात. विभाजी उती आणि स्थायी उती.
· संयोजी उती या इंद्रिये आणि इतर उतींना एकत्र बांधून ठेवतात.
· स्नायू उती हालचालीसाठी असतात.
· फुलांचे निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग असे चार भाग असतात.
· दृश्य केंद्रकी पेशींमध्ये सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक असतो तर आदि केंद्रकी पेशीमध्ये मात्र सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक नसतो.
· जिवाणू पेशी ही आदिकेंद्रकी पेशी आहे.
· सर्वे शैवाले, कवके, प्रोटोझुआ, वनस्पती आणि प्राणी ही दृश्य केंद्रकी पेशींची उदाहरणे आहेत.
· डी.एन.ए. हा एकरेषीय व्दिसपीर्ल मोठया आकाराचा रेणू असून तो दोन बहुन्यू क्लिओटाइडसच्या धाग्यापासून तयार होतो.
· डी.एन.ए. चे मुख्य कार्य म्हणजे जननिक माहितीचे जणूकाच्या रूपात संग्रहण करणे होय.
· आर.एन.ए. हा सुद्धा बहुन्यूक्लिओटाइडसचा रेषीय रेणू असतो.
· कुठल्याही जातीसाठी गुणसुत्रांची संख्या कायम असते.
· मानवमध्ये 46 गुणसत्रे असतता.
· तंतुकनिकेची लांबी साधारणपणे 1.5 ते 10 um तर रुंदी 0.25 ते 1.00 um यांच्या दरम्यान असते.
· तंतुकनिकेची मुख्य कार्य म्हणजे ऊर्जानिर्मिती करून ती ए.टी.पी. रूपात साठवून ठेवणे.
· तंतुकनिकांना पेशींचे ऊर्जाकेंद्र असे म्हणतात.
· केंद्रकाच्या आधारद्र्व्यास केंद्रक द्रव्य म्हणतात. यामध्ये क्रोमॅटिन असते.
· ज्या पोषणपद्धतीमध्ये प्रकाशाचा वापर ऊर्जा म्हणून केला जातो, त्यास प्रकाश संश्लेषी पोषण पद्धती असे म्हणतात.
· वरील उदाहरणे – सर्व वनस्पती, शैवाले, युग्लिना, काही जीवाणू.
· प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत रेन्विय प्राणवायूची मुक्तता होते.
· ज्या पोषणपद्धतीत अकार्बनी रसायानांचा वापर ऊर्जा म्हणून केला जातो त्यास रसायन संश्लेषी पोषण पद्धती असे म्हणतात.
· उदा. नायट्रोफाईंग जीवाणू, लोह उपचयनी जीवाणू, गंधक उपचयनी जीवाणू
· पिचर प्लँट, निपेंथस, सनड्यू (ड्रोसेरा) यासारख्या किटकाहारी वनस्पती त्याच्या नत्रयुक्त आणि प्रथिन गरजांसाठी कीटक व इतर सूक्ष्म प्राण्यांवर अवलंबून असतात.
· आपल्या अन्न गरजपूर्तीसाठी दुसर्यार सजीवांवर अवलंबून असणारे सजीव परपोषी म्हणून ओळखले जातात. उदा. प्राणी, कवके, बहुकेत जीवाणू.
· विकरे ही विविध प्रकारची प्रथिने असून पचनसंस्थेच्या विविध अंगांव्दारे त्यांची निर्मिती व स्त्रवण होते.
· मृतोपजीवी पोषण गट – अनेक कवके (किन्व, बुरशी आणि छत्रकवके) जीवाणू.
· बाह्यपरजीवी – गोचिड, डास, ढेकूण, उवा किंवा जळू अमरवेल, बांडगुळ.
· वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग
शास्त्रीय नाव |
मराठी नाव |
उपयोग |
रेडीमीटर |
रेडीमीटर |
उत्सर्जित शक्ती मोजणारे उपकरण |
टॅकोमीटर |
विमानगतीमापक |
विमान व मोटारबोटींची गतिमानता मोजणारे उपकरण |
सॅलिंनोमीटर |
क्षारमापक |
क्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण |
डायनॅमो |
जनित्र |
विद्युत निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण |
अॅमीटर |
वीजमापी |
विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण |
कॅलोरीमीटर |
उष्मांक मापक |
उष्मांक मोजणारे उपकरण |
हायड्रोमीटर |
जलध्वनी मापक |
पाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणारे साधन |
फोटोमीटर |
प्रकाशतीव्रता मापी |
प्रकाशाची तीव्रता मोजू शकणारे उपकरण |
मायक्रोफोन |
मायक्रोफोन |
आवाज लहरींचे विद्युत लहरीत रूपांतर करून वर्धन करणारे उपकरण |
रडार |
रडार |
विमानतळाकडे येणार्या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे उपकरण |
पायरो मीटर |
उष्णतामापक |
500' सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान दूर अंतरावरून मोजू शकणारे उपकरण |
कार्डिओग्राफ |
हृदयतपासणी |
हृदयाची जागरूकता आजमावणारे उपकरण |
बॅरोमीटर |
वायुभारमापन |
वातावरणातील हवेचा दाब मोजणारे यंत्र |
लॅक्टोमीटर |
दूधकाटा |
दुधाची सुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण |
स्फिरोमीटर |
गोलाकारमापी |
पृष्ठभागाची वक्रता मोजणारे उपकरण |
फोनोग्राफ |
फोनोग्राफ |
आवाज लहरी निर्माण करणारे यंत्र |
मॅनोमीटर |
वायुदाबमापक |
वायुदाब मोजू शकणारे उपकरण |
सॅकरीमिटर |
शर्करामापी |
रासायनिक द्रव्यातील साखरेचे प्रमाण मोजणारे उपकरण |
ऑडिओमीटर |
ध्वनीमापक |
आवाजाची तीव्रता मोजणारे उपकरण |
क्रोनोमीटर |
वेळदर्शक |
आगबोटीवर वापरले जाणारे घड्याळ |
टेलिस्कोप |
दूरदर्शक |
आकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त |
कार्ब्युरेटर |
कार्ब्युरेटर |
वाहनात पेट्रोल, वाफ व हवेचे मिश्रण करणारे उपकरण |
अॅनिओमीटर |
वायुमापक |
वार्याचा वेग व दिशामापक उपकरण |
स्टेथोस्कोप |
स्टेथोस्कोप |
हृदयातील व फुफ्फुसाची माहिती पुरविणे |
अल्टिमीटर |
विमान उंचीमापक |
विमानात वापरले जाणारे ऊंची मोजण्याचे यंत्र |
स्पेक्ट्रोमीटर |
वर्णपटमापक |
एका पदार्थातून दुसर्या पदार्थात सूर्यकिरण जाताना त्याचा वक्रीभवन कोन मोजणारे उपकरण |
टेलिप्रिंटर |
टेलिप्रिंटर |
संदेश टाईपरायटरवर टाईप करू शकणारे स्वयंचलित यंत्र |
सिस्मोग्राफ |
भूकंपमापी |
भूकंपाची तीव्रता मोजू शकणारे यंत्र |
थर्मामीटर |
तापमापक |
उष्णतेचे प्रमाण मोजणारे उपकरण |
कॅलक्युलेटर |
गणकयंत्र |
अगोदर पुरविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय प्रश्न क्षणार्धात सोडवणारे यंत्र |
युडीऑमीटर |
युडीऑमीटर |
रासायनिक क्रिया होत असताना वायूच्या घनफळात होणारा बदल मोजू शकणारे यंत्र |
होल्टमीटर |
होल्टमीटर |
विजेचा दाब मोजणारे यंत्र |
बायनॉक्युलर |
व्दिनेत्री दुर्बिण |
एकाच वेळी दोन्ही डोळ्यांनी दूरची वस्तु स्पष्ट व मोठ्या आकारात पाहण्यास उपयुक्त दुर्बिण |
विंडव्हेन पेरीस्कोप |
वातकुक्कुट परीदर्शक |
वार्याची दिशा दाखवणारे यंत्र दृष्टी रेषेच्या वरच्या पातळीवरील वस्तु पहाण्यासाठी |
थिओडोलाइट |
थिओडोलाइट |
भ्रूपृष्ठाची मोजणी, वक्रता, कोन मोजणारे यंत्र |
रेनगेज |
पर्जन्य मापक |
पावसाच्या प्रमाणाची मोजणी करणारे यंत्र |
स्प्रिंगबॅलन्स |
तानकाटा |
वजन, शक्ति व बल यांची जलद पण स्थूलमानाने मापन |
गॅल्व्होनोमीटर व्काड्रन्ट |
सूक्ष्मवीजमापी |
ऊंची व कोन मापक सूक्ष्म वीज प्रवाह मोजू शकणारे उपकरण नवीन खगोलशास्त्रीय |
विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे
1. सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t)
2. त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)
3. बल = वस्तुमान * त्वरण
4. गतिज ऊर्जा = 1/2mv2
5. स्थितीज ऊर्जा = mgh
6. आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा
7. विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u
8. सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता
9. प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान
10. रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान
11. प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान
12. द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार
13. दोन बिंदूमधील विभवांतर = कार्य / प्रभार
14. विद्युतधारा = विद्युतप्रभार / काळ
15. वाहनाचा रोध (R) = विभवांतर (V) / विद्युतधारा (I)
16. समुद्राची खोली = ध्वनीचा पाण्यातील वेग * कालावधी / 2
17. ध्वनीचा वेग = अंतर / वेळ
18. पदार्थाने शोषलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील वाढ
19. पदार्थाने गमावलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील घट
20. उष्णता विनिमयाचे तत्व = उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता
21. ओहमचा नियम = I = V / R
22. विद्युतप्रभार = विद्युतधारा * काल
23. कार्य = विभवांतर * विद्युतप्रभार
वनस्पती व प्राण्यांमधील ऊती
वनस्पती ऊती :
शरीरांच्या भागांना अवयव म्हणतात. अवयव हे ऊती पासून बनलेले असतात. ऊती या पेशिसमुहापासून बनलील्या असतात. सजीवांच्या विविध अवयवांची कार्य भिन्न असल्यामुळे यांच्या रचनेतही फरक दिसून येतो.
वनस्पतींची वाढ हि त्यांच्या मुळ व खोडांच्या अग्रभागी दिसून येते. याचे कारण म्हणजे अग्रभागासी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ऊती असतात. पेशींच्या विभाजन क्षमतेनुसार वनस्पती उतीचे विभाजी ऊती व स्थायी ऊती असे वर्गीकरण केले जाते.
हि एकाच वनस्पती ऊती अशाप्रकारची ऊती आहे, ज्यात पेशिविभाजानाद्वारे नवीन पेशींची निर्मिती होते.
यातील पेशींच्या भित्तिका पटल असतात. यामध्ये ठळक केंद्रक असते. त्याचे झपाट्याने विभाजन होते.
या विभाजी ऊती कोणत्या विभागामध्ये आढळतात यावरून त्यांचे प्ररोह विभाजी(Apical meristem)आणि पार्श्व विभाजी ऊती (lateal meristem)असे प्रकार आहेत.
अंतरीय विभाजी ऊती हा सुद्धा एक प्रकार आहे.(Entercalary Meristem).
प्ररोह विभाजी ऊती हि खोडाच्या व मुलाचा अग्रक़्भगि असते.
खोड किंवा मुळचा घेर व्रुंडी पार्श्व विभाजी उतीमुळे होते.
अंतर विभाजी ऊती हि पानांच्या तळासी व फांदीच्या तळासी असते. त्या अतिक्रियाशील असतात.
विशिष्ट भूमिका बजावल्यानंतर विभाजी उतीच्या पेशी विबाह्जानामुळे तयार झालेल्या पेशींची विभाजनाची प्रक्रिया थांबते.
स्थायी ऊती :
यामुळे स्थायी ऊती तयार होतात . स्थायी आकार , आकृती व कार्य घडवण्याच्या या प्रक्रियेस 'विभेदन' (differentiation) असे म्हणतात.
स्थायी ऊती या सरळ स्थायु किंवा जातील स्थायू ऊती असतात.
सरल स्थायी ऊती :
या ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असून या उतींचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते.
मुल ऊती:
यातील पेशी जिवंत असतात. यात केंद्रक असून याची भित्तिका पातळ असते.
या पेशींमध्ये मोकळी जागा असते. या पेशी बटाटा व बिट यासारख्या वनस्पतीत अन्न साठवण्याचे कार्य करतात .
हरित ऊती:
वनस्पतींच्या पानामधील ऊतींना हरित ऊती म्हणतात.
वायू ऊती:
जलीय वनस्पतीमध्ये अंतरपेशिय पोकळ्यामुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. पाण्यावर तरंगण्याची क्षमता देतात . त्यांना वायू ऊती असे म्हणतात.
स्थूलकोन ऊती :
या ऊती प्रामुख्याने पानाच्या डेठात आढळतात . त्या पाने,खोड व फांद्या यांना लवचिकता देतात .
दृढ ऊती :
दृढ ऊती मधील पेशी मृत असतात . त्यांच्या भिंती जाड असतात . या ऊती खोड संवाहणी पूल . शिरा व बियांच्या कठीण कवचामध्ये आढळतात .
विशिष्ट रचणे मुळे वनस्पती टणक व ताठ बनतात.
मलमलचे कापड अंबाडीच्या दृढ ऊतीपासून बनवले जाते .
पृष्ठभागीय ऊती :
वनस्पतींचा संपुर्ण पृष्ठभाग हा पृष्ठभागीय उतींच्या थराने बनतो .
या आपित्वाचीय पेशी सपाट असतात.
हि ऊती वनस्पतीच्या सर्व भागांचे संरक्षण करते.
निवडूंगासारख्या वनस्पतींचे बाह्य आवरण हे जाडसर असते.
बाह्य आवरणातील पेशी नेहमी मेणासारखा पदार्थ स्त्रवत असतात. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.
वातावरणा बरोबर वायूंचे देवाणघेवाण करण्यासाठी पानांच्या बाह्य आवरणाला सूक्ष्मछिद्रे असतात . त्यांना पर्णरंध्रे असे म्हणतात.
पर्णरंध्रा भोवती घेवड्याच्या आकाराच्या दोन रक्षक पेशी असतात. त्या पर्णरंध्राची उगढझाप नियंत्रित करतात.
पर्णरंध्रा मधून बाष्पउत्सर्जन होते.
झाडाच्या सालातील पेशी या मृत पेशी असतात. त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात.त्यांच्या भित्तीकांवर सुबेरींन नावाचे रसायन असते.या रसायनामुळे सालीतून वायू व पाणी यांची देवाण घेवाण होऊ शकत नाही.
जटील स्थायी या एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात.
यापूर्वी बघितलेल्या उरती फक्त एकाच प्रकारच्या पेशींपासून बनलेल्या होत्या.
जटील स्थायी ऊती :
जटील स्थायी ऊती मधील पेशींमध्ये एकमेकांत समन्वय असतो.
संवहणी ऊती हि जटील ऊती आहे . मुले, खोड , पाने यामध्ये हि असते . ती पाणी व अन्न यांचे वहन करते.
मूळ,खोड व पानातील संवाहणी ऊती एकमेकांशी जोडलेल्या असतात. संवाहणी ऊती हे उच्च स्तरीय वनस्पतींचे महत्त्वाचे कार्य आहे.
जलवाहिनी व रसवहिनि हि संवाहिनी ऊती ची उदाहरणे आहेत.
जलवाहिनी :
पेशीभित्तिका जाड असून बहुतेक पेशी मृत असतात.
त्यांचे मुखेत्वे खालील प्रकार पडतात.
वाहिनिका: या पेशी मृत झाल्यावर त्यांच्यातील पेशिद्रव्याचे विघटन होते. त्यानंतर तयार झालेल्या पोकळ जाळ्यातून पाण्याचे वहन होऊ शकते.
वाहिन्या : वाहिनिका पेक्षा रुंद असतात. पाणी व क्षार यांचे वहन होते.
जलवाहिनी : ऊती अन्न साठवते.
जलवाहिनी तंतू : मजबुती देतात.
रसवहिनी : या चार प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या आहेत.
चलन नलिका : सच्छिद्र पटल असते.
सहपेशी : या चाळण नलिके भोवती असतात .तिच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात.
रसवाहिनी तंतू :मुखेत्वे खोडात असून वनस्पतींना मजबुती देतात.
रसवाहिनी मुलऊती : इतर सर्व प्रकारच्या पेशींना एकत्र ठेवण्यचे काम या पेशी करतात.रसवाहिन्या अन्नाचे वहन करतात.पानाकडून शर्करा व अमिनोम्लाचे वनस्पतींच्य खोड व मुळाकडे वहन करतात.
प्राणी ऊती :
अभिस्तर ऊती :
प्राण्यांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे अवयव समन्वयाने काम करीत असतात.
स्नायूपेशी या तंतूरुपात असतात.त्या त्यांची लांबी बदलू शकतात.स्नायू हे उतीचे उदाहरण आहे.
ऑक्सिजन आणि पोषद्राव्याचे सर्व पेशींकडे वाहन करणारे रक्त सुद्धा उतीचे उदाहरण आहे.
प्राणी उतीची अभिस्तर ऊती , संयोजी ऊती , स्नायू ऊती ,चेता ऊती, या प्रमाणे वर्गीकरण केले आहे.
प्राणी शरीरातील बाह्य आणि संरक्षक आवरण अभिस्तर ऊती पासून बनलेले असतात.
शरीरातील इंद्रियसंस्था वेगवेगळी ठेवण्याचे कार्य अभिस्तर ऊती करते.
रक्तवाहिन्या मधील स्तर , फुफुसातील वायुकोश , अन्ननलिका व तोंडातील आतील स्र्तारात सरल पट्टकि अभिस्तर ऊती आढळतात.
आतड्यातील आतील स्तरात स्तंभीय अभिस्तर ऊती असतात .त्यांच्यामार्फत पाचक रस स्त्रवले जातात.
श्वसन मार्गामध्ये रोमक स्तंभीय अभिस्तर असते.
वृक्कनालीकांचाआतील सतार, लाळग्रंथींच्या नलिका यामध्ये घनाभरूप अभिस्तर ऊती असतात.
त्वाचे मधून घाम , तैलद्रव्य , श्लेष्मल पदार्थ इ.स्त्रावण्याचे कार्य ग्रंथील अभिस्तर ऊती मार्फत केले जाते.
संयोजी ऊती :
संयोजी ऊतीमध्ये अधारक असते आणि त्या आधारकामध्ये पेशी रुतलेल्या असतात . अधारक हे जेली सारखे द्रवरूप दाट किंवा दृढ असते.
संयोजी उतींचे प्रकार पुढीलप्रमाणे :
अस्थी: स्नायूंना घट्ट धरून ठेवतात.मुख्य अवयवांना आधार देतात.
रक्त: हे द्रवरूप संयोजी ऊती आहे. यामध्ये लोहित रक्त कणिका , श्वेतरक्तकणिका आणि रक्तपट्टीका,असतात.रक्तद्रवात प्रथिने , क्षार , संप्रेरके असून शरीराच्या विविध भागाकडे वायू , पोषकद्रव्य व संप्रेरके यांचे वहन केले जाते.
अस्थीबंध: यामुळे दोन हाडे जोडली जातात. लवचिक आणि मजबूत असतो.
स्नायुरज्जू: यांच्याद्वारे स्नायू हाडांशी जोडले जातात. तंतुमय ,मजबूत परंतु कमी लवचिक असतात. नेत्रागोलास त्याच्या भोवतालच्या हाडासी जोडतात.
कास्थी: कास्थीमुळे हाडाच्या संध्याच्या ठिकाणी नरमपणा येतो. या पेशी नाक , कान, श्वास नलिका , स्वरयंत्रातील पोकळी यामध्ये आढळतात.
विरळ ऊती: त्वचा व स्नायू यांच्या दरम्यान, रक्तवाहिनिच्या भोवताली , चेतातंतू व अस्थिमज्जेत आढळतात.
चरबीयुक्त ऊती : त्वचेखाली , वृक्काच्या सभोवताली व अंतरीन्द्रीयांमध्ये आढळतात . या ऊती मधील पेशी मेद्पिंदाने भरलेल्या असतात . मेद्संचायामुळे हि ऊती उष्णतारोधक म्हणून काम करते.
स्नायू ऊती :
स्नायू ऊती या स्नायूतंतुच्या लांब पेशी पासून बनलेल्या असतात.
स्नायूंमध्ये असणारे 'संकोची प्रथिन' द्वारे स्नायूंची हालचाल होते.
ज्या स्नायुद्वारे आपल्या शरीराच्या हालचालीवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्यास ऐच्छिक स्नायू असे म्हणतात.
या पेशी मधील पेशी लांब,दंडगोलाकार,अशाखीय ,बहुकेंद्रकीय असतात.
ऐच्छिक स्नायुंना कंकाल स्नायू किंवा पट्टकि स्नायू असे देखील म्हणतात.
काही स्नायूंची हालचाल आपण आपल्या मनाप्रमाणे करू शकत नाही .त्यांना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात.
डोळ्यांची परीतारिका मुत्रावाहिनी व स्वसनी,इ .ठिकाणी अनैच्छिक स्नायू असतात.
हृदयाच्या भित्तीमध्ये आढळणारे 'परीहृद स्नायू ' हे सुद्धा अनैच्छिक स्नायू आहेत.
चेताऊती :
मेंदू,चेतारज्जू,चेतातंतू हे सर्व चेता उतींनी बनलेले असतात.
या उतीतील पेशींना चेतापेशी असे म्हणतात. चेतापेशीमध्ये केंद्रक व पेशीद्र्व्य असते.पेशीद्रव्यातून लांब , केसासारखे बारीक तंतू निघतात त्यास अक्षतंतू म्हणतात.
एखाद्या चेतापेशीची लांबी एक मीटर इतकीही असू शकते.
अनेक चेता तंतू संयोजी उतीद्वारे एकत्र येऊन चेता तयार करतात.
या ऊती चेतना ग्रहण करतात आणि या चेतना अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वहन करतात.
क्षयरोग त्याची लक्षणे व उपचार
· हा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो.
· या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी 24 मार्च 1882 रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन' असेही म्हणतात.
· जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
· क्षयरोगचा प्रसार हवेमार्फत (रुग्णाच्या खोकण्याने, शिकण्याने) होतो.
· क्षयरोगाचे जंतू मुख्यतः फुप्फुसावर परिणाम करतात म्हणून फुप्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
क्षयरोगाचे प्रकार : 1. फुप्फुसाचा 2. इतर अवयवांचा (ग्रंथी, हाडे/सांधे, मूत्रपिंड, मेंदूआवरण, आतड्यांचा, कातडीचा इ.)
क्षयरोगाची लक्षणे :
1. तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,
2. हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप
3. वजन कमी होणे
4. थुंकीतून रक्त पडणे
5. भूक मंदावणे इ.
क्षयरोगाचे निदान : लहान मुलांमधील क्षयरोग निदानासाठी 'मोन्टोक्स टेस्ट' वापरली जाते.
1. थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.
2. 'क्ष-किरण' तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्रीशीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.
प्रतिबंधक लस -
0 ते 1 वर्ष बालकांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्या लसीला 'बी.बी.सी' (बॅसिलस कॉलमेटग्युरिन) असे म्हणतात.
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 1962 साली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक्स-रे तपासणीवर जास्त भर
होता तसेच औषधोपचाराचा कालावधी जास्त होता.(दीर्घ मुदतीचा)
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) सन 1992-93 मध्ये सुरू करण्यात आला.
क्षयरोग औषधोपचार :
सुधारित कार्यक्रमामध्ये क्षय रुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली चार प्रकारच्या गोळ्या तसेच 'स्ट्रेप्टोमायसीन' हे इन्जेक्शन देण्यात येते.
1. सदर औषधोपचार पद्धतीला डॉट्स (DOTS) असे म्हणतात.
2. DOTS - Directly Observed Treatment With Short Cource Cheniotherapy (प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग औषधोपचार)
हिवताप व त्याची लक्षणे
हिवताप :
हिवताप हा जगातील एक सर्वात जुना रोग आहे.
हिवताप हा 'प्लाझमोडिअम' नामक 'परजीवी जंतू' मुळे होतो.
हिवताप हा 'अॅनॉफिलीस' प्रकारच्या डासामार्फत (मादी) पसरतो.
डासांमधील नर डास चावत नाही. अंडी घालण्यासाठी मदांना रक्ताची गरज असल्याने फक्त मदांचा दंश करून रक्त शोषून घेतात. तर नर डास हा पानांच्या रसावर (तृणरस) जगतो.
हिवताप रुग्णास अॅनाफिलीस जातीची मादी चावल्यास व दुसर्या निरोगी माणसास चावल्यास प्रसार होतो.
'हिवताप जंतूचा शोध' 1880 मध्ये सर डॉ. अल्फ्रेंड लॅव्हेरॉन यांनी लावला.
सन 1897 मध्ये सर रोनॉल्ड रॉस यांनी हा रोग अॅनाफिलीस जातीची मादी डासांमुळे मानवामध्ये पसरत जातो हे सिद्ध केले व हिवताप जंतूच्या जीवनचक्राचा शोध लावला.
हिवतापाची लक्षणे :
थंडी वाजून ताप येणे आणि घाम आल्यावर ताप ओसरतो.
प्लीहेची वाढ होते.
रक्तक्षय होतो.
कर्करोगाचे कारणे व प्रकार
कर्करोग :
या रोगात पेशीची अनियंत्रित व अमर्याद वाढ होते.
कर्करोग, फुप्फुस, तोंड, जीभ, रक्त, स्तन, गर्भाशय इ. कोणत्याही अवयवाला होतो.
पुरुषांमध्ये फुप्फुसाचा व स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
कारणे :
तंबाखू, धूम्रपान, रंजके, किरणोत्सार, अल्ट्रा व्हायोलेट किरणे, क्ष-किरणे इ. मुळे होतो.
या रोगाच्या निदानपद्धतीला बायोस्पी (गाठीचा तुकडा काढून तपासणे) म्हणतात.
कर्करोगाचे प्रकार :
ल्युकेमिया - पांढर्या पेशींचा कर्करोग
लिम्फोमिया - तांबड्या पेशींचा कर्करोग
सार्कोमा - संयुजी उतींचा कर्करोग
कार्सींनोमा - अभिस्तर पेशींचा कर्करोग
स्वाईन फ्ल्यू चे लक्षणे व उपचार
स्वाइन फ्ल्यू :
'स्वाईन फ्ल्यू' एन्फ्लुएंझा-ए (एच-1 एन-1) पॅनडेमिक
एन्फ्लुएंझा-ए (एच-1 एन-1) या साथीचा ताप येण्याला 'स्वाईन फ्ल्यू' असे म्हणतात.
पक्षी, डुक्कर आणि माणूस यांच्यातील विषाणूंच्या एकत्रीकरणातून एच-1 एन-1 हा नवीन विषाणू तयार झाला आहे.
जगातील आरोग्य संघटनेने 'महासाथ' हा आजार जाहीर केला आहे.
रोगाची लक्षणे :
1. धाप लागणे.
2. जीभ व ओठ काळेनीळे पडणे.
3. खूप चिडचिड होणे.
4. खोकला व शिंक येणे.
5. शरीर दुखणे.
6. घसा खवखवणे.
7. चक्कर येणे.
8. थंडी वाजून येणे.
9. डोके दुखणे.
10. थकवा जाणवणे.
11. छाती व पोट दुखणे.
उपचार :
'टॅंमिफ्लू' व 'रेलेन्झा' ही औषधे वापरली जातात.
मेक्सिको, अमेरिका, कॅनडा व भारत या देशांमध्ये 'स्वाईन फ्ल्यू' एच-1 एन-1 या विषाणूंमुळे डुकरापासून मानवाला लागण झाली आहे.
महाराष्ट्रातील पुणे शहरातील रिदा शेख या चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून ती देशातील स्वाईन फ्ल्यूची पहिली बळी आहे.
गतीविषयक नियम :
गती :
· जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते, तेव्हा ती वस्तु गतिमान आहे असे म्हणतात.
· आपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू देखील शकतो.
· गती आपोआप सुरू होत नाही अथवा थांबत नाही.
बल :
· स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.
· वस्तूची गती किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी बलाचा उपयोग होतो.
· बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.
· बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.
· बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.
· वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.
संतुलित बल :
· जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होणार्या दोन बलांचे परिणाम सारखे आणि दिशा विरुद्ध असतात, तेव्हा वस्तूवर प्रयुक्त होणारे एकूण बल शून्य असते.
· दोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.
· संतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.
असंतुलित बल :
· असंतुलित बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो किंवा गतीची दिशा बदलते.
· वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.
· जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो.
जडत्व :
वस्तूची
स्थिर अथवा
गतिमान
अवस्थेतील
बदलाला विरोध
करण्याची
प्रवृत्ती
म्हणजे जडत्व होय.
जेव्हा
एखाद्या
स्थिर
अवस्थेतील
वस्तूवर कोणतेही
बाह्यबल
प्रयुक्त
नसेल तर ती
वस्तु स्थिर
अवस्थेतच
राहते. तसेच
गतिमान वस्तु
आहे त्याच
वेगाने सतत
गतिमान राहते.
जडत्वाचे प्रकार :
1. विराम अवस्थेतील जडत्व :
वस्तूच्या
ज्या
स्वाभाविक
गुणधर्मामुळे
ती विराम
अवस्थेत बदल
करू शकत नाही, त्यास
विराम
अवस्थेतील
जडत्व असे
म्हणतात.
उदा. बस
अचानक सुरू
होते तेव्हा
प्रवाशांना
मागच्या
दिशेला धक्का
बसतो.
2. गतीचे जडत्व :
वस्तूच्या
ज्या
स्वाभाविक
गुणधर्मामुळे
गतिमान
अवस्थेत बदल
होवू शकत नाही
त्यास गतीचे
जडत्व
म्हणतात.
उदा.
चालत्या
बसमधून
उतरणारा
प्रवासी
पुढच्या
दिशेने पडतो.
3. दिशेचे जडत्व :
वस्तूच्या
ज्या स्वाभाविक
गुणधर्मामुळे
ती आपल्या
गतीची दिशा
बदलू शकत नाही
यास दिशेचे
जडत्व
म्हणतात.
उदा.
चाकूला धार
करतांना धार
लावण्याच्या
चाकांच्या
स्पर्शरेषेवरून
ठिणग्या
उडताना दिसतात.
न्यूटनचे गतीविषयक नियम :
पहिला नियम :
'जर
एखाद्या
वस्तूवर
कोणतेही
बाह्य
असंतुलित बल
कार्यरत नसेल
तर तिच्या
विराम
अवस्थेत किंवा
सरल रेषेतील
एकसमान
गतीमध्ये
सातत्य राहते'.
यालाच 'जडत्वाचा
नियम' असे
म्हणतात.
उदा. बस
अचानक सुरू
होते तेव्हा
प्रवाशांना मागच्या
दिशेला धक्का
बसतो.
दूसरा नियम :
'संवेग
परिवर्तनाचा
दर प्रयुक्त
बलाशी समाणूपाती
असतो आणि
संवेगाचे
परिवर्तन
बलाच्या
दिशेने होते'.
उदा.
गच्चीवरून
समान आकाराचे
बॉल खाली
टाकणे.
संवेग - वस्तूमध्ये
सामावलेली
एकूण गती
म्हणजे संवेग
होय.
p=mv
संवेग
परिवर्तनाचा
दर = संवेगात
होणारा बदल / वेळ
=mv-mu/t
=m(v-u)/t
तिसरा नियम :
'प्रत्येक
क्रिया बलास
समान
परिमानाचे
एकाच वेळी
घडणारे प्रतिक्रिया
बल
अस्तित्वात
असते व
त्याच्या दिशा
परस्पर
विरुद्ध
असतात'.
उदा.
जेव्हा
बंदुकीतून
गोळी मारली
जाते तेव्हा
बंदूक गोळीवर
बल प्रयुक्त
करते आणि
त्यामुळे
गोळीला अधिक
वेग प्राप्त
होतो.
सामान्य विज्ञान (इयत्ता 8 वी) संपूर्ण माहिती
आकाशगंगा :
· सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8 ग्रह फिरतात.
· चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
· प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.
· चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.
· एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.
· एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.
·
· प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.
· प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.
· बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.
· बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.
· पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला 'पहाटतारा' म्हणतात.
· पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना 'अंतर्ग्रह', तर कक्षेबाहेरील ग्रहांना 'बाह्यग्रह' म्हणतात.
· 'मंगळ' हा पहिला बाह्यग्रह आहे.
· सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे 'गुरु'
· गुरूला एकूण 63 उपग्रह आहेत.
· शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.
· शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.
· धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.
· हॅले हा धूमकेतू 76 वर्षानी दिसतो. आता 2060 मध्ये दिसेल.
· भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.
· त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.
· ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले.
· GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.
· टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.
· आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.
· जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.
चुंबकत्व :
· 5 मार्च 1872 रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.
· चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.
· मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.
अणूंची संरचना :
· इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अणूतील मूलकण आहेत.
· अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.
· प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
· अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.
· अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.
· मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.
· मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला 'संयुजा' म्हणतात.
महत्वाचे मुद्दे :
· विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.
· जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.
· स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.
· पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.
· साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.
· संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ.
· संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.
· पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.
· रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.
· WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र काढली आहेत. (Directly Observed Treatment)
· मनुष्यप्राणी 'व्हीब्रिओ कॉलरा' या कॉलर्याचचा जिवाणू वाहक आहे.
· लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.
· त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.
इयत्ता 7 वी संपूर्ण माहिती
महत्वाचे मुद्दे :
· अनविकरणीय – हवा, माती, खनिजे, पाणी (निर्माण करणे आवाक्याबाहेरचे असते).
· हवा प्रदूषणाचे हवेतील कार्बनडायऑकसाईडचे प्रमाण वाढत असल्याने जागतिक तपमानवाढीचे उदभवले आहे.
· इस्त्राईल मधील जॉर्डन नदीवर कालवे काढून जलसिंचनाची सोय केल्याने वाळवंटी भागात उत्तम शेती करता येते.
· समुद्राच्या पाण्यात मॅग्नेशिअम क्लोराईड, सोडीयम क्लोराईड हे क्षार असतात.
· तारावरील जमिनीवर ठराविक अंतरावर आडवे चर खणून पावसाचे पाणी चरात अडवून धरले जाते यालाच 'नालाबंर्डिंग' असे म्हणतात.
· 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून पाळला जातो.
· वनस्पती व प्राण्यातील विशिष्ट जणूके दुसर्याह वनस्पतीत व प्राण्यात थेट सोडून हव्या त्या गुणधर्माची नवीन प्रजाती प्रयोग शाळेत निर्माण करता येऊ शकते त्याला जैविक तंत्रज्ञान असे म्हणतात.
· डोडो व भारतीय चित्ता यांची जणूके आपण कायमची हरवून बसलो आहोत.
· संयुक्त राष्ट्रसंघाने दरडोई 50 ली. पाण्याची गरज रोजची असल्याचे सुचवले आहे.
· पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे.
· 22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
· जलाशयाच्या पृष्ठभागावर सेटील अल्कोहोलचा शिडकावा केल्यास बाष्पीभवन कमी होते.
· वनस्पतीच्या पानातील हरितद्रव हे प्रकाश उर्जेचे रूपांतर रसायनिक उर्जेत करते.
· अभ्रक हे उष्णतेचे सुवाहक तर विजेचे दुर्वाहक आहे.
· वायूंचे प्रसारण हे स्थायू आणि द्रवाच्या प्रसारणापेक्षा अधिक असते.
· भट्टीचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणार्या तापमापीला 'पायरोमीटर' म्हणतात.
· आयोडीन व नॅप्थालिन हे संप्लवनशील पदार्थ आहेत.
· अमीबा,पॅरमॅशिअम, क्लोरेल्ला हे एकपेशीय सजीव आहेत.
· सजीवांची रचना आणि कार्य पेशीच्या पातळीवर होत आहेत.
· समान कार्य करणार्या पेशीच्या समूहाला 'उती' असे म्हणतात.
· उती पातळीवर संघटन असणारे सजीव – मॉस, शैवाल, जलव्याल.
· ठराविक काम एकत्रितपणे करण्यासाठी इंद्रिय समूहाला 'इंद्रिय संस्था' म्हणतात.
· प्राण्यांच्या किंवा वनस्पतींचा समूह ज्या विशिष्ट जागेत राहून विकसित होतो त्या जागेस 'अधिवास' म्हणतात.
· एकपेशीय जीवामध्ये विभाजन पद्धतीने प्रजनन होते. उदा. जिवाणू, क्लोरेल्ला.
· कालिका पासून होणार्याा प्रजननास कलिकयन म्हणतात. उदा. किन्व (यीस्ट)
· पुमंग हा नर घटक तर जयांग हा स्त्री घटक असतो.
· पुमंगातील परागकण जायांगाच्या कुक्षीवर पडल्यास ते रुजतात. याला 'परागण' असे म्हणतात.
· अंड्यात वाढणार्याज जीवांना अंडज म्हणतात. तर गर्भाशयातून जन्मणारे जरायूज.
· सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे चार कप्पे असतात.
· हृदयाकडून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेणार्यान रक्तवाहिन्यांना 'धमण्या' म्हणतात.
· शरीराच्या भागाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्यांना 'शिरा' म्हणतात.
· धमन्यांना फाटे फुटून त्या केसासारख्या बनतात. त्यांना 'केशिका' म्हणतात.
· अॅनेमिया, थालेसेमिया, कॅन्सर ग्रस्त रुग्णांना बाहेरून रक्तपुरवठा केला जातो.
· अन्न घटकातील अमिनोआम्लाचा शरीरबांधणीसाठी उपयोग होतो.
· अळूच्या पानात कॅल्शिअम ऑक्झॅलेटचे स्फटिक असतात.
· मूलद्रव्याच्या अतीसूक्ष्म कणाला 'अणू' म्हणतात.
· पुढील मूलद्रव्यात दोन अणू असतात- ऑक्सीजन, हायड्रोजन, क्लोरिन, नायट्रोजन.
· रणगाड्याचे कठीण कवच तयार करण्यासाठी अॅल्युमिनियम, मॅग्नेशिअम हे धातू आणि नायलोन व फायबर ग्लास हे पदार्थ वापरतात.
· 20 Hz ते 20000 Hz दरम्यानच्या वारंवारितेचा ध्वनी माणसाला ऐकता येतो. त्याला 'श्राव्य ध्वनी' म्हणतात.
· अवश्राव्य ध्वनीच्या मदतीने वाटवाघळला समोरच्या वस्तूची जाणीव होते.
· 20 C या तापमानावर ध्वनीचा वेग सुमारे 340 m/s असतो.
· अँबरला ग्रीक भाषेत 'इलेक्ट्रॉन' म्हणतात.
· काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घांसल्यास धन विद्युतप्रभार निर्माण होतो.
· एबोनाईटची दांडी उनी कपड्यावर घासली की तिच्यावर ऋण प्रभार निर्माण होतो.
· आकाशातील विजेचा धोका टळण्यासाठी उंच इमारतीवर तडीतवाहक बसवतात.
· छ्दमपादाच्या सहाय्याने अमीबा पुढे सरकतो.
· स्वादूपिंडामधून इन्शुलिन स्त्रवते तर यकृतामधून पित्तरस स्त्रवतो.
· शर्करांचे प्रकार – फ्रूक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज, लॅक्टोज, इ.
· प्रथिने ही मूलत: नट्रोजनयुक्त कार्बनी पदार्थ आहेत.
· प्रथिने शरीर बांधणीच्या कामात महत्वाची भूमिका बजावतात.
· आनुवांशिक गुणधर्माचे नियोजन करणारे डी – ऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल (DNA), रायबो न्यूक्लिक असिड (RNA) हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत.
· 'अ' जीवनसत्वाच्या अभावी रातआंधळेपणा होतो.
· 'ब' जीवनसत्वाच्या अभावी जीभ लाल, त्वचा रखरखीत, बेरीबेरी
· 'क' जीवनसत्वाच्या अभावी हिरड्यातून रक्त येणे, स्कव्ह्री
· 'ड' जीवनसत्वाच्या अभावी मुडदुस पाठीला बाक येणे, पायाची हाडे वाकणे.
· कॅल्शिअमच्या अभावी हाडे ठिसूळ बनतात. दातांची झीज होते.
· फॉस्फरसच्या त्रुटिमुळे वजनात घट होते व वाढ खुंटते.
· लोहाच्या अभावामुळे पंडूरोग, रक्तक्षय (अॅनेमिया) हा विकार होतो.
· आयोडीनच्या अभावामुळे गलगंड (गॉयटर) हा रोग होतो.
· आपल्या मानेत असणार्यां अवटू ग्रंथीमधून थायरोस्झिन संप्रेरक स्त्रवते.
· प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणार्याप रासायनिक पदार्थांना 'संप्रेरके' म्हणतात.
· जणूके पेशीच्या केंद्रकामध्ये समवलेली असतात. उंची वाढण्यास करणीभूत असलेले वृद्धी संप्रेरके मेंदू मधील पियुषिकेत तयार होते.
· किटकभक्षी वनस्पती – दवबिंदू (ड्रोसेरा), घटपर्णी या आहेत.
· जहाजावर किती माल भरावा याचा निर्देश करण्यासाठी जहाजाच्या खालच्या भागावर रेषा आखलेल्या असतात. त्यांना प्लीम सोल रेषा म्हणतात.
· लोलकातून गेल्यावर सूर्यचा प्रकाश सात रंगात विभागतो. त्यामध्ये तांबडा रंग वर असतो तर जांभळा रंग सर्वात खाली असतो.
· रंगाचा क्रम – तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा
· उष्णतेचे स्थलांतर तीन प्रकारे होते – वहन, अभिसरण, प्रारण.
· थर्मासफ्लास्क मध्ये गरम किंवा थंड वस्तू तापमानामध्ये फरक न होता दीर्घकाळ त्याच तापमानावर गरम किंवा थंडच राहते.
· गरम पदार्थ गरम ठेवण्यासाठी जी भांडी वापरतात त्यांना 'थर्मोवेयर' म्हणतात.
·
उष्णतेचे
सुवाहक – तांबे, लोह, अल्युमिनिअम, इ.
उष्णतेचे
दुर्वाहक – माती, लाकूड, काच, इ.
· रक्त देण्याची प्रक्रिया म्हणजे रक्तदान तर रक्त घेण्याची प्रक्रिया 'रक्त पराधन' होय.
· रक्तामध्ये युरिया साचून राहिल्यास चक्कर येते.
· प्रजनन मुख्यत्वे पुढील दोन प्रकारे होते –
अलैंगिक प्रजनन :
वनस्पती -
1. शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)
2. विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल
3. कलिकायन - किन्व यीस्ट
4. बिजाणूजन्य - बुरेशी
5. खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा
लैंगिक प्रजनन:
वनस्पती -
· सपुष्प वनस्पतीमध्ये फुलांचा लैंगिक प्रजननात सहभाग असतो.
प्राणी -
· नर आणि मादीच्या संयोगातून गर्भोशयात युग्मनज तयार होतो आणि वाढीतून नवीन जीव तयार होतो.
· वृक्काचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला 'डायलेसिस (व्याष्लेषण)' म्हणतात.
· बल्बच्या दिव्यात तंगस्टनची तार असते. तंगस्टनची संज्ञा W आहे. वुलफ्रेम (Wolfram) या जर्मन नावावरून ती घेतली आहे.
· आंदोलन काल (T) हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो.
· कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी एकू शकतात.
· परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तीत दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.
· जे सजीव स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. तर ज्यांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी म्हणतात.
· विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रसायनिक पदार्थांचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मिकरन म्हणतात.
· हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायोक्साइड, प्रकाश, हरितद्रव, पाणी या घटकाची गरज असते.
· आयोडीन द्रावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.
पिष्टमय पदार्थ :
·
पिष्ट, विविध
शर्केरा, तंतुमय
पदार्थ यांचा
समावेश येतो.
·
तांदूळ, गहू, मका, बाजारी, ज्वारी या
तृणधान्यांमद्धे
पिष्ट भरपूर
असते.
·
पिष्टमय
पदार्थाचे
विघटन होऊन
त्यांचे ग्लुकोजमध्ये
रूपांतर होते.
·
जरुरीपेक्षा
जास्त
झालेल्या
ग्लुकोजचे रूपांतर
ग्लायकोजेनमध्ये
होऊन यकृतात
साठवले जाते.
· पिष्टमय पदार्थापासून उर्जा मिळते.
प्रथिने –
·
तूर, हरभरा, मटकी, सोयाबीन
या डाळी तसेच
दूध अंडी, मासे, मांस यांपासून
प्रथिने
मिळतात.
· विविध जैवरासायनिक क्रिया घडवून आणण्यास मदत करणारी विकरे सुद्धा मुळात प्रथिनेच आहेत.
स्निग्ध पदार्थ -
·
तेल, तूप, लोणी, मेद, मेदाम्ले ही
उदाहरणे.
· स्निग्धपदार्थांच्या विघटनामुळे उर्जा प्राप्त होते.
· पालेभाज्या तसेच फळांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ असतो.
चेतासंस्था :
· मानवाच्या चेतासंस्थेमध्ये प्रामुख्याने मेंदू, चेतरज्जू, चेतातंतू असतात.
· चेतासंस्थेचे मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्था असे दोन गट पडतात.
· मेंदू आणि चेतारज्जुंचा मध्यवर्ती चेतासंस्थेत समावेश होतो.
· चेतातंतूचा समावेश परिघीय चेतासंस्थेत होतो.
· चेतातंतू निरनिराळ्या अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेची संपर्क घडवून आणतात.
· शरीरातील विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठविण्याचे काम अपवाही चेतातंतू करतात.
· चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात.
· काही क्रिया घडताना संदेश मेंदुपर्यंत न पोहचता फक्त चेतातंतूपर्यंत पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात.
· अंत:स्त्रावी ग्रंथी वाहिनीहीन असतात. उदा. पियुषिका, अवटू, अधिवृक्क,पाईनी,हृदोधिष्ठ.
आम्ल आणि आम्लारी :
· सामन्यात: धातूंची ऑक्साइड्स आम्लारीधर्मी असतात.
· पाण्यात विरघळणार्या आम्लारिंना 'अल्कली' म्हणतात.
· सर्व अल्कली आम्लारी असतात, परंतु सगळे आम्लारी अल्कली नसतात.
· उदासीनिकरणात क्षार आणि पाणी तयार होतात.
·
जेव्हा
दाहक आम्ल आणि
दाहक आम्लारी
यांच्यात
रासायनिक
अभिक्रिया
होते तेव्हा
मिळणारे क्षार
उदासिन असतात.
उदा. मीठ, सोडीयम
नायट्रेट.
· दाहक आम्ल आणि सौम्य आम्लारीच्या रासायनिक अभिक्रियेतून मिळणारे क्षार आम्लधर्मी असतात.
· अॅल्युमिनिअम क्लोराईड, अमोनिअम सल्फेट क्षार आम्लधर्मी असतात.
· दाहक आम्लारी आणि सौम्य आम्ल यातून मिळणारे क्षार हे आम्लारिधर्मी असतात.
· धुण्याचा सोडा (सोडीयम कार्बोनेट), बेकिंग सोडा (सोडीयम बायकार्बोनेट) हे क्षार आम्लारिधर्मी आहेत.
· प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात.
· लोणची, मुरांबा टिकविण्यासाठी अॅसेटीक आम्ल किंवा बेंझोईक आम्ल वापरतात.
· आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते. त्यामुळे अन्नपचन सुलभ होते.
· गरजेपेक्षा जास्त वाढले की अपचन होते. त्यावर उपाय म्हणून मॅग्नेशियम हायड्रोक्साइड सारखी आम्लारिधर्मी औषधे दिली जातात.
· कला रंग जास्त उष्णता शोषून घेतो म्हणून सौरचुलीतील भाड्यांना बाहेरून काळा रंग असतो.
· तापमापीमध्ये पार्याऐवजी अल्कोहोल वापरता येईल.
· पाण्याची विशिष्ट उष्मा सर्वाधिक असल्यामुळे शीतक म्हणून मोटारीमध्ये आणि यंत्रामध्ये त्याचा उपयोग होतो.
· लघवीमधील साखरेमुळे मधुमेह या रोगाचे निदान होते.
· आरसा पुसल्याने त्यावर विधूतभार तयार होतो म्हणून त्यावर लगेच धूळ बसते.
· शीतपेयातील सोडा आम्लारी वर्गात मोडतो.
विज्ञान व विषयशाखा
1. |
मीटिअरॉलॉजी |
हवामानाचा अभ्यास |
2. |
अॅकॉस्टिक्स |
ध्वनीचे शास्त्र |
3. |
अॅस्ट्रोनॉमी |
ग्रहतार्यांचा अभ्यास |
4. |
जिऑलॉजी |
भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास |
5. |
मिनरॉलॉजी |
भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास |
6. |
पेडॉगाजी |
शिक्षणविषयक अभ्यास |
7. |
क्रायोजेनिक्स |
अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र |
8. |
क्रिस्टलोग्राफी |
स्फटिकांचा अभ्यास |
9. |
मेटॅलर्जी |
धातूंचा अभ्यास |
10. |
न्यूरॉलॉजी |
मज्जसंस्थेचा अभ्यास |
11. |
जेनेटिक्स |
अनुवंशिकतेचा अभ्यास |
12. |
सायकॉलॉजी |
मानवी मनाचा अभ्यास |
13. |
बॅक्टेरिऑलॉजी |
जिवाणूंचा अभ्यास |
14. |
व्हायरॉलॉजी |
विषाणूंचा अभ्यास |
15. |
सायटोलॉजी |
पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र |
16. |
हिस्टोलॉजी |
उतींचा अभ्यास |
17. |
फायकोलॉजी |
शैवालांचा अभ्यास |
18. |
मायकोलॉजी |
कवकांचा अभ्यास |
19. |
डर्मटोलॉजी |
त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र |
20. |
मायक्रोबायोलॉजी |
सूक्ष्मजीवांचा अभ्यास |
21. |
इकॉलॉजी |
परिस्थितिकी शास्त्र (सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास) |
22. |
हॉर्टीकल्चर |
उद्यानविद्या |
23. |
अर्निथॉलॉजी |
पक्षिजीवनाचा अभ्यास |
24. |
अँन्थ्रोपोलॉजी |
मानववंश शास्त्र |
25. |
एअरनॉटिक्स |
हवाई उड्डाण शास्त्र |
26. |
एण्टॉमॉलॉजी |
कीटक जीवनाचा अभ्यास |
विज्ञानातील संशोधक व त्यांनी लावलेले शोध
क्र. |
संशोधक |
शोध |
1. |
सापेक्षता सिद्धांत |
आईन्स्टाईन |
2. |
गुरुत्वाकर्षण |
न्यूटन |
3. |
फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट |
आईन्स्टाईन |
4. |
किरणोत्सारिता |
हेन्री बेक्वेरेल |
5. |
क्ष-किरण |
विल्यम रॉटजेन |
6. |
डायनामाईट |
अल्फ्रेड नोबेल |
7. |
अणुबॉम्ब |
ऑटो हान |
8. |
प्ंजा सिद्धांत |
मॅक्स प्लॅक |
9. |
विशिष्टगुरुत्व |
आर्किमिडीज |
10. |
लेसऱ |
टी.एच.मॅमन |
11. |
रेडिअम |
मेरी क्युरी व पेरी क्यूरी |
12. |
न्युट्रॉन |
जेम्स चॅड्विक |
13. |
इलेक्ट्रॉन |
थॉम्पसन |
14. |
प्रोटॉन |
रुदरफोर्ड |
15. |
ऑक्सीजन |
लॅव्हासिए |
16. |
नायट्रोजन |
डॅनियल रुदरफोर्ड |
17. |
कार्बनडाय ऑक्साइड |
रॉन हेलमॉड |
18. |
हायड्रोजन |
हेन्री कॅव्हेंडिश |
19. |
विमान |
राईट बंधू |
20. |
रेडिओ |
जी.मार्कोनी |
21. |
टेलिव्हिजन |
जॉन बेअर्ड |
22. |
विजेचा दिवा,ग्रामोफोन |
थॉमस एडिसन |
23. |
सेफ्टी लॅम्प |
हंप्रे डेव्ही |
24. |
डायनामो |
मायकेल फॅराडे |
25. |
मशीनगन |
रिचर्ड गॅटलिंग |
26. |
वाफेचे इंजिन |
जेम्स वॅट |
27. |
टेलिफोन |
अलेक्झांडर ग्राहम बेल |
28. |
थर्मामीटर |
गॅलिलिओ |
29. |
सायकल |
मॅक मिलन |
30. |
अणू भट्टी |
एन्रीको फर्मी |
31. |
निसर्ग निवडीचा सिद्धांत |
चार्ल्स डार्विन |
32. |
अनुवंशिकता सिद्धांत |
ग्रेगल मेंडेल |
33. |
पेनिसिलीन |
अलेक्झांडर फ्लेमिंग |
34. |
इन्शुलीन |
फ्रेडरिक बेंटिंग |
35. |
पोलिओची लस |
साल्क |
36. |
देवीची लस |
एडवर्ड जेन्नर |
37. |
अॅंटीरॅबिज |
लस लुई पाश्चर |
38. |
जीवाणू |
लिवेनहाँक |
39. |
रक्तगट |
कार्ल लँन्डस्टँनर |
40. |
मलेरियाचे जंतू |
रोनाल्ड रॉस |
41. |
क्षयाचे जंतू |
रॉबर्ट कॉक |
42. |
रक्ताभिसरण |
विल्यम हार्वे |
43. |
हृदयरोपण |
डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड |
44. |
डी.एन.ए.जीवनसत्वे |
वॅटसन व क्रीक |
45. |
जंतूविरहित शस्त्रक्रिया |
जोसेफ लिस्टर |
46. |
होमिओपॅथी |
हायेमान |
भौतिक राशी व त्यांची परिमाणे/एकके
क्र |
भौतिक राशी |
परिमाणे/एकक |
1. |
विद्युतरोध |
ओहम |
2. |
विद्युतधारा |
कुलोम |
3. |
विद्युतभार |
होल्ट |
4. |
विद्युत ऊर्जा |
ज्युल |
5. |
वेग |
m/s |
6. |
त्वरण |
m/s2 |
7. |
संवेग |
kg/ms |
8. |
कार्य |
ज्यूल |
9. |
शक्ती |
ज्यूल/सेकंद |
10. |
बल |
Newton |
11. |
घनता |
kg/m3 |
12. |
दाब |
पास्कल |
No comments:
Post a Comment